50 उपकेंद्रांवर उद्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा

16 हजार परीक्षार्थी || दीड हजार अधिकारी- कर्मचार्‍यांची नियुक्ती
50 उपकेंद्रांवर उद्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्ह्यातील 50 उपकेंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 यावेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी दिली.

या परीक्षेसाठी नगर शहरातील 50 उपकेंद्रावर एकूण 16 हजार 081 उमेदवार परीक्षेस बसलेले आहेत. या उपकेंद्रावर (शाळा/महाविद्यालय) उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. या परीक्षेकामी उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी 13 , भरारी पथक प्रमुख 2, वर्ग 1 संवर्गातील उपकेंद्र प्रमुख 50 अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, समवेक्षक, मदतनीस असे विविध वर्ग 3 संवर्गातील एकूण एक हजार 425 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी 9.30 वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com