‘या’ महिन्यात होणार शिष्यवृत्ती परीक्षा

‘या’ महिन्यात होणार
 शिष्यवृत्ती परीक्षा

संगमनेर (वार्ताहर) / sangamner - महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्ट रोजी घेण्याचे आदेश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

करोना च्या पार्श्वभूमीवरती दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा या वर्षी एप्रिल महिन्यात घेण्याची परवानगी देण्यात आली होती. तथापि राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

त्यामुळे परीक्षा घेण्यासंदर्भात शासनस्तरावर त्याच्या वतीने प्रस्ताव पाठविण्यात आला होता सदरच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली असून राज्यात इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 8 ऑगस्टला शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात परीक्षा परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने कार्यवाही होण्याची शक्यता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com