जनतेच्या मनातील सरकारवर ‘सुप्रीम’ शिक्कामोर्तब - ना. विखे पाटील

आ. राधाकृष्ण विखे पाटील
आ. राधाकृष्ण विखे पाटील

लोणी |वार्ताहर| Loni

जनतेच्या मनातील सरकारवर ‘सुप्रिम’ शिक्कामोर्तब आजच्या निर्णयामुळे झाले असून अधिकचे काम करण्याची शक्ती सरकारला मिळाली असल्याची प्रतिक्रिया महसूल पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केली.

आ. राधाकृष्ण विखे पाटील
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालावर आ. बाळासाहेब थोरात म्हणाले शिंदे फडणवीस सरकार हे..

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निकालानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी या निर्णयाचे ‘बाजीगर’ ठरलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचे अभिनंदन करून आजचा निकाल म्हणजे दररोज पोपटपंची करणार्‍या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा असल्याचे स्पष्ट केले.

आ. राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेरातील ‘त्या’ 57 स्टोन क्रेशर मालकांना पुन्हा नोटीस

सरकार बेकायदेशीर असल्याचा आरोप रोज करून जनतेची दिशाभूल करणारे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे चेहरे आज उघडे पडले असल्याचे सांगून राज्य सरकार स्थिर होतेच परंतु आजच्या निर्णयामुळे अधिकचे काम करून जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा विश्वास मंत्री विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केला.

समान कार्यक्रम घेवून तयार झालेल्या आघाडीला आता सामान गुंडाळण्याची वेळ आली असल्याचा टोला लगावून मंत्री विखे म्हणाले, सध्या महाविकास आघाडीमध्ये भविष्यकार तयार झाले आहेत. त्यांचे सर्व अंदाज आजच्या निर्णयामुळे खोटे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. राधाकृष्ण विखे पाटील
करजगाव-अंमळनेर येथील वाळू लिलाव व डेपो लिलाव बंद करण्यासाठी बेमुदत उपोषण

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नैतिकतेच्या गप्पा करू नयेत. कारण राज्यातील जनतेन भाजप शिवसेना (BJP Shivsena) युतीला दिलेला कौल अमान्य करून कॉग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) सोबत गेलात. सत्तेसाठी विचार आणि हिंदुत्व सोडले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्‍या कॉग्रेस नेत्यांच्या मांडीला मांडी लावून आजही बसता. मुख्यमंत्री असताना देवभक्ती आणि देशभक्ती दाखवली म्हणून अनेकांना तुरूंगात टाकले. तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती, असा सवालही मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित केला.

आ. राधाकृष्ण विखे पाटील
साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात व तामिळनाडूची आघाडी
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com