नदीकाठावर धास्ती वाढली! जायकवाडीत तब्बल 'इतक्या' क्युसेकने पाण्याची आवक

नदीकाठावर धास्ती वाढली! जायकवाडीत तब्बल 'इतक्या' क्युसेकने पाण्याची आवक

अस्तगांव | वार्ताहर

जायकवाडी धरणातून आज सकाळी ११ वाजता १८ दरवाजातून टप्प्या टप्प्याने ९३४० क्युसेकने विसर्ग सुरु झाला आहे. मराठवाडा, नाशिक, नगर जिल्ह्यातून पाण्याची मोठी आवक होत आहे.

आज दुपारी १२ वाजता जायकवाडी जलाशयात १ लाख ३० हजार क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे जयकवाडीतून खाली गोदावरीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जाऊ शकतो.

निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर बांधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने ४५०८२ क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे नगर, नाशिक जिल्ह्यात गोदावरीला पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.