साडेआठ हजार परीक्षार्थी रविवारी देणार राज्यसेवा परीक्षा

24 उपकेंद्रावर व्यवस्था || 933 अधिकारी- कर्मचार्‍यांची नियुक्ती
साडेआठ हजार परीक्षार्थी रविवारी देणार राज्यसेवा परीक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने (Maharashtra Public Service Commission) घेण्यात येणारी राज्यसेवा (पूर्व) परीक्षा 2021 (State Services (Pre) Examination) रविवार, 21 ऑगस्ट 2022 रोजी जिल्ह्यातील 24 उपकेंद्रावर सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत दोन सत्रात घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित (Resident Deputy Collector Sandeep Nichit) यांनी दिली.

या परिक्षेसाठी नगर शहरातील (Nagar City) 24 उपकेंद्रावर एकूण आठ हजार 616 उमेदवार परिक्षेस बसलेले आहेत. या उपकेंद्रावर (शाळा/महाविदयालय) उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. या परीक्षेकामी उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी सहा, भरारी पथक प्रमुख एक, वर्ग 1 संवर्गातील उपकेंद्र प्रमुख 24 अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, समवेक्षक, मदतनीस असे विविध वर्ग 3 संवर्गातील एकूण 902 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रथम सत्रासाठी सकाळी 8.30 वाजता व दुसर्‍या सत्रासाठी दुपारी 1.30 वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. मोबाईल पेजर डिजीटल डायरी, मायक्रोफोन, स्मार्टवॉच यांसारखी दूरसंचार साधने परीक्षा केंद्राच्या परीसरामध्ये आणि परीक्षा दालनात आणण्यास व स्वतःजवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. या सूचनांचे उल्लंघन करणार्‍या उमेदवारास सदर परिक्षेसाठी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) पुढील सर्व परीक्षांसाठी कायमस्वरूपी प्रतिरोधीत करण्यात येणार आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 6 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता कलम 1973 चे कलम 144 (3) लागू करण्यात आलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com