कार्डिलेंनी गाठले १५०?

विधान परिषेदेच्या तोंडावरील मेळावा चर्चेत
कार्डिलेंनी गाठले १५०?

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

३० वर्षापासून बुऱ्हाणनगर येथे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे दिवाळी पाडव्यानिमित्त फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून स्नेहमेळावा भरवतात. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोविडचे संकट असल्याने मागील वर्षी हा स्नेहमेळावा भरवण्यात आला नव्हता, परंतु यावर्षी रुग्णसंख्या कमी झाल्याने शिवाजीराव कर्डिले यांच्या कडून पाडव्यानिमित्त फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावर्षी विधान परिषदेची निवडणूक आली असल्याने कर्डिले यांनी ही निवडणूक हाती घेतली आहे अशी चर्चा या कार्यक्रमात रंगू लागली. नगर, पाथर्डी, राहुरी विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित होते. याच बरोबर जिल्ह्यातील विधान परिषदेचे सुमारे १५० मतदारांनी स्नेह मेळाव्यात हजेरी लावली, असा दावा कर्डिले समर्थक करत आहेत.

कर्डिले यांनी २५ वर्ष विधानसभेचे प्रतिनिधित्व केल्यामुळे जिल्ह्यामध्ये सर्वच पक्षात त्यांचा दांडगा संपर्क आहे. यामुळे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे भविष्यकाळात कर्डिले यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

खासदार डॉ. सुजय विखे यांनी एका कार्यक्रमात स्पष्टपणे जाहीर केले की, कर्डिले लवकरच आमदार होणार, त्यांच्या या वक्तव्यानंतर जिल्हाभर चर्चेला उधाण आले. फराळाच्या झालेल्या कार्यक्रमामध्ये कर्डिले यांनी डॉ. सुजय विखे यांच्यासह विविध मान्यवरांचे तोंड गोड केले.

यावेळी माजी मंत्री राम शिंदे, आ.मोनिका राजळे,माजी आ.बाळासाहेब मुरकुटे, पांडुरंग अभंग, उपमहापौर गणेश भोसले, जिल्हा परिषद माजी उपध्यक्ष सुजित झावरे, अशोक खेडकर, अंबादास पिसाळ, नामदेव राऊत, जयश्रीताई ससाणे, विवेक कोल्हे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी आमदार राहुल जगताप, प्रतिभा पाचपुते, दादाभाऊ चितळकर, चाचा तनपुरे तसेच जिल्ह्यातील सामाजिक राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com