
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
महाराष्ट्र केसरी गटासाठी सुदर्शन कोतकर (गादी) तर विक्रम शेटे (माती) हे अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. महाराष्ट्र केसरी अहमदनगर जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा श्रीगोंद्यातील पारगाव सुद्रिक येथे संपन्न झाल्या यात ही निवड करण्यात आली.
श्रीगोंदा येथील पारगाव सुद्रिक या गावी महाराष्ट्र केसरी गादी व माती विभाग फ्रीस्टाईलसाठी अहमदनगर जिल्हा कुस्ती संघाच्यावतीने जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन आ.बबनराव पाचपुते, जिल्हा तालीम संघ अध्यक्ष वैभव लांडगे यांच्याहस्ते करण्यात आले.
या निवड चाचणीत राज्यस्तरीय वरिष्ठ गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92,97 व महाराष्ट्र केसरी गटसाठी 86 ते 125 किलो वजनगटासाठी (गादी व माती) निवड चाचणी स्पर्धा पार पडल्या. यामध्ये महाराष्ट्र केसरी गटासाठी विक्रम शेटे (माती) व सुदर्शन कोतकर(गादी) या मल्लांची जिल्हा निवड चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. या निवड चाचणी साठी पंच म्हणून पै.. संभाजी निकाळजे, पप्पू कालेकर, रवी बोत्रे, गणेश जाधव, हंगेश्वर धायगुडे, संजय डफळ, ईश्वर तोरडमल, केशव बोत्रे यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.. वैभव लांडगे, खजिनदार पै. नाना डोंगरे, उपमहाराष्ट्र केसरी पै.. अनिल गुंजाळ, पै.. विलास चव्हाण, नगर शहर तालिम संघाचे अध्यक्ष पै.. नामदेव लंगोटे, उपाध्यक्ष सुनील भिंगारे, बजरंग महांकाळ, सचिव मोहन हिरणवाळे, कार्याध्यक्ष अजय अजबे, खजिनदार कैलास हुंडेकरी,पै.. नाना डोंगरे, श्रीगोंदा तालुका तालीम संघाचे अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी संदीप बारगुजे, नगरसेवक अशोक खेडके, कर्जत तालीम संघाचे तालुका अध्यक्ष प्रवीण घुले, पारनेर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे, पै.. हर्षवर्धन कोतकर तसेच पंचायत समितीचे माजी सभापती शहाजी हिरवे, वस्ताद बबनराव डफळ, नाना डोंगरे, मेजर हनुमंत फंड, सोपान हिरवे, संतोष सोनवणे, पै. सोहेल शेख, पै. महेश भोस, पै. संदीप गायकवाड, पै. अजय रंधवे, पै. सोपान शिंदे, पै. उत्तम आव्हाड, पोलीस पै. महेश नानगुडे, पै.अतुल कोकणे, पै. सोनबा कोळपे तालुक्यातील आजी-माजी नामांकित पै.लवान उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजक पै. नंदू रेपाळे, पै. रवी कोठारे, पै. नितीन मोरे व पारगाव ग्रामस्थ यांनी उत्कृष्ट रित्या स्पर्धेचे नियोजन केले. सर्व यशस्वी खेळाडूंची बालेवाडी पुणे येथे होणार्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी निवड झालेल्या सर्व यशस्वी पैलवानांचे जिल्हा तालिम संघाच्यावतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पात्र मल्ल असे
गादी विभागासाठी : तेजस ढवळे, गणपत शेटे , कुमार देशमाने, कार्तिक रांधवण, सौरभ गाडे, आकाश घोडके, ऋषिकेश लांडे, आकाश भिंगारे, अनिल ब्राम्हणे,
माती विभाग : सचिन मुरकुटे, विश्वजित सुरवसे, श्रीकांत दंडे, विकास तोरडमल, ऋषिकेश शेळके, विकास गोरे, श्रीकृष्ण पवार, सागर कोल्हे, अभिमन्यू फुले पात्र ठरले.