पैलवानांनो तयारीला लागा! 'महाराष्ट्र केसरी'चा थरार नगरमध्ये रंगणार

पैलवानांनो तयारीला लागा! 'महाराष्ट्र केसरी'चा थरार नगरमध्ये रंगणार

अहमदनगर | Ahmednagar

कुस्ती (Wrestling) या रांगड्या खेळासाठी प्रसिद्ध असलेली राज्यातील सर्वात मोठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा अहमदनगर जिल्ह्यात खेळवली जाणार आहे. येणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे यजमानपद अहमदनगर जिल्ह्याला मिळाले आहे.

स्पर्धेचे यजमानपद मिळावे, यासाठी पुणे, ठाणे आणि वेल्हे आदींसह काही कंपन्याही आग्रही होत्या परंतु स्पर्धा आयोजनाचा मान नगरलाच देण्यात आला. अहमदनगरच्या कुस्तीपटूनसाठी ही आनंदाची बाब आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आमदार संग्राम जगताप आयोजक असणार आहेत.

डिसेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्र केसरी होण्याची शक्यता आहे. अद्याप तारखा जाहीर झालेल्या नसून लवकरच होणार आहेत. त्यामुळे जीवाचं रान करणाऱ्या मल्लांसाठी आनंदाची बातमी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com