Maharashtra Din : राहाता तहसील येथे आ. विखे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Maharashtra Din : राहाता तहसील येथे आ. विखे यांच्या हस्ते ध्वजारोहण

राहाता | तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याच्या ६२ व्या स्थापना दिवसाच्या (Maharastra Din) निमित्ताने राहाता तहसिल कार्यालयाच्या (Rahata Tehsil Office) प्रांगणात माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या (Kamgar Din) आ. विखे पाटील यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. तसेच राहाता विभागातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच मिळवलेल्या पुररस्काराबद्दल प्रातिनिधिक स्वरुपात आ. विखे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

विविध शासकीय योजनांमधील लाभार्थींना धनादेशाचे वितरण आ.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, गणेशचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, संचालक रघुनाथ बोठे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.