यंदा महाराष्ट्रदिनी पोलीस पथकांचे होणार संचलन

तयारी पूर्ण; करोनामुळे दोन वर्षे होता खंड
यंदा महाराष्ट्रदिनी पोलीस पथकांचे होणार संचलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना महामारीच्या काळात महाराष्ट्र दिन साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यंदा मात्र दोन वर्षांनंतर महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम होणार असून, येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस पथकांचे संचलन होणार आहे.

पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण व शासकीय कार्यक्रम होणार आहे. यावेळी पोलिसांचे संचलनही होणार आहे. पोलीस प्रशासनाकडून याची तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस दलाच्या 5 तुकड्या व होमगार्डची एक तुकडी संचलनात सहभागी होणार आहे. यात महिला पोलीस कर्मचार्‍यांचीही तुकडी सहभागी होणार आहे. तसेच जिल्हा पोलीस दलाचे बँड पथकही संचलनात असणार आहे.

पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सध्या या तुकड्यांचा संचलनाचा सराव सुरू आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असल्याने व करोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र दिनानिमित्त शहरात इतरही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची तयारी सुरू झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com