पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना पोलीस महासंचालकांचे शौर्यपदक जाहीर!

जिल्ह्यातील तीन पोलीस कर्मचार्‍यांचा ही समावेश
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना पोलीस महासंचालकांचे शौर्यपदक जाहीर!

श्रीरामपुर |प्रतिनिधी| Shrirampur

पोलीस अधिकारी (Police Officer) व कर्मचार्‍यांचा दरवर्षी महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) सन्मान करण्यात येतो. यावर्षी ही पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके (DYSP Sandeep Mitke) यांच्यासह तीन पोलीस कर्मचार्‍यांना (Police Worker) पदक जाहीर झाले आहे.

राहुरी तालुक्यामध्ये (Rahuri Taluka) एका गुन्हेगाराने काही दिवसांपूर्वी एका कुटुंबास ओलीस ठेऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या गुंडाच्या ताब्यातून या कुटुंबाची सुटका करण्याच्या वेळेस झालेल्या गोळीबारामध्ये पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पायाला गोळी चाटून गेली होती. मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी शस्त्रधारी सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेऊन ओेलीस ठेवलेल्या कुटुंबाची सुटका केली होती.

त्यांच्या या उत्कृष्ट कर्तव्यनिष्ठेने, निर्भीडपणे आणि शौर्याने महाराष्ट्र पोलीस दलाची गौरवशाली परंपरा कायम राखून असाधारण वीरतेचे व अद्वितीय कर्तव्यपरायणतेचे प्रदर्शन घडविले. त्यांच्या या प्रशंसनीय स्वरूपाच्या दृश्य व अति उत्तम कार्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर (Director General of Police Honorary Announced) करण्यात आले आहे.

तसेच अहमदनगर पोलीस दलातील सहाय्यक फौजदार जितेंद्र ढवळे, पोलीस नाईक माधुरी तोडमल व दीपक घाटकर यांना देखील पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले.

Related Stories

No stories found.