महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला सायबर सेलकडून अटक; काय आहे प्रकरण?

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला सायबर सेलकडून अटक; काय आहे प्रकरण?

अहमदनगर | Ahmednagar

राहुरी येथील महात्मा फुले विद्यापीठातील एका विद्यार्थ्याला महाराष्ट्र सायबर सेलने अटक केली आहे. गणेश नारायण गोटे (वय २९) असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

ट्विटर हँडल वापरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि काही महिला पत्रकारांबद्दल चुकीच्या पद्धतीने असभ्य टिप्पण्या पोस्ट केल्याबद्दल अटक केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सायबर अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

आरोपींकडून २ मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. त्याला कोर्टात हजर करून २ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आल्याचं महाराष्ट्र सायबर एसपी संजय शिंत्रे यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com