महाराष्ट्र बंद : नगर शहरात काय आहे परिस्थिती? पाहा व्हिडीओ

महाराष्ट्र बंद : नगर शहरात काय आहे परिस्थिती? पाहा व्हिडीओ

अहमदनगर l प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व घटकांनी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे.

नगर शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या वतीने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालुन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काही काळ रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा पहायला मिळाल्या. मात्र, व्यापारी व छोटे व्यवसायिकांचा अल्प प्रतिसाद पहायला मिळाला.

Related Stories

No stories found.