नेवासा तालुक्यात 'महाराष्ट्र बंद'ला कसा मिळाला प्रतिसाद?

नेवासा तालुक्यात 'महाराष्ट्र बंद'ला कसा मिळाला प्रतिसाद?

नेवासा (का प्रतिनिधी)

उत्तर प्रदेशातील लखिमपूर खेरी येथील घटनेप्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नेवासा तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

नेवासा येथील खोलेश्वर गणपती चौकात निदर्शने करून घटनेचा निषेध करण्यात आला. मोर्चाने जाऊन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, प्रहार जनशक्ती, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, दादासाहेब गंडाळ, अभिजित पोटे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ शेळके, शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के, कॉ. बन्सी सातपुते, कॉ. बाबा आरगडे, अशोक मिसाळ, अशोक कोळेकर, शोभा पातारे, गणेश झगरे, पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, काँग्रेसचे कमलेश गायकवाड आदि सहभागी झाले होते. तालुक्यातील चांदा, कुकाणा ही गावे लॉकडाऊनमुळे बंद आहेत. भेंडा परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. छोटी गावे सुरू होती. एसटी बस वाहतूकही सुरू होती.

Related Stories

No stories found.