दुध उत्पादक व शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी सदैव लढा चालू राहील
सार्वमत

दुध उत्पादक व शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी सदैव लढा चालू राहील

स्नेहलता कोल्हे : झगडे फाटा येथे महाएल्गार आंदोलन

Nilesh Jadhav

सोनेवाडी | वार्ताहर | Sonewadi

राज्यातील पशुपालक व शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी व दूध उत्पादकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. आघाडी सरकारच्या काळात सर्वात जास्त फटका शेतकरी व दूध उत्पादकांना बसला आहे. दुर्दैवाने शेतकर्‍यांना पंधरा ते सोळा रुपये दराने आपल्या दूधाची विक्री करावी लागते आहे.

निद्रिस्त झोपी गेलेल्या सरकारला आता जाग आणण्याची गरज असून जोपर्यंत शेतकर्‍यांना व दूध उत्पादकांना रास्त भाव मिळत नाही. तोपर्यंत शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी लढा चालूच राहील दुधाला सरसकट 10 रुपये प्रतिलिटर अनुदान, दूध खरेदीचा दर 30 रुपये प्रति लिटर, व दूध भुकटी निर्यातीला प्रति लिटर 50 रुपये अनुदान मिळाल्याशिवाय गप्प राहणार नाही असे प्रतिपादन स्नेहलता कोल्हे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे झगडे पाटा चौफुलीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रा स प व रिपाई महायुतीचे कार्यकर्त्यांना बरोबर घेत केलेल्या महाएल्गार आंदोलनात बोलत होत्या. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, माजी सरपंच केशवराव होन, संचालक संजय होन, केशवराव भवर,दिपक गायकवाड, नितीन कापसे, हरिभाऊ गिरमे कैलास खैरे चंद्रकांत औताडे, आप्पासाहेब औताडे, ज्ञानेश्वर होन ,धनंजय माळी ,गणेश राऊत,रमेश औताडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा योगिता होन, सरपंच पुनम खरात, उपसरपंच विजय होन, व्ही टी होन, किरण होन,सखाहरी राऊत, मच्छिंद्र जावळे ,किरण होन ,रावसाहेब होन, बाजीराव होन, भाऊसाहेब होन, प्रल्हाद होन, प्रशांत होन, जितेंद्र होन अदी उपस्थित होते.

कोपरगाव तालुक्यातील 78 गावात दुध उत्पादक केंद्रावर आघाडी सरकारचा निषेध म्हणून हे महाएल्गार आंदोलन करण्यात आले. केशवराव होन यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Deshdoot
www.deshdoot.com