श्री विशाल गणपतीची पोलीस अधीक्षकांच्या हस्ते महापूजा

श्री विशाल गणपतीची पोलीस अधीक्षकांच्या हस्ते महापूजा

अहमदनगर | Ahmednagar

नगरचे (Ahmednagar) ग्रामदेवत श्री विशाल गणेश (Shri Vishal Ganpati) मंदिरात जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) व सौ.मिनल पाटील यांच्या हस्ते महापूजा करत ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यंदा मंदिरात कोविड नियमांचे (COVID rules) पालन करत साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला जात आहे.

श्री विशाल गणपतीची पोलीस अधीक्षकांच्या हस्ते महापूजा
Ganesh Chaturthi : 'लालबागच्या राजा'चे ऑनलाइन दर्शन कसे घ्याल?, जाणून घ्या

शुक्रवारी सकाळी महापूजेसाठी मंदिराचे अध्यक्ष अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे,पुजारी संगमनाथ महाराज आदींसह विश्वस्त उपस्थीत होते. गणेश भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची (Online darshan) सुविधा करण्यात आली आहे.

आकर्षक विद्युत रोषणाईने मंदीर सजले आहे. यावर्षी विसर्जन मिरवणुकीवरही बंदी असल्याने साध्या पद्धतीने श्री गणेशाचे विसर्जन होणार असल्याचे मंदिर व्यवस्थापनाने जाहीर केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com