मध्यमेश्वर बंधारा बनला अनेकांच्या उपजिवीकेचे साधन

मासेमारी जोरात; प्रवरेच्या पाण्यात वाहून येताहेत 8 ते 10 किलो वजनाची विविध जातींची मासे
मध्यमेश्वर बंधारा बनला अनेकांच्या उपजिवीकेचे साधन

नेवासा बुद्रुक |वार्ताहर| Newasa

करोना (Covid) सारख्या महामारीत अंडी चिकन मासे ( Eggs Chicken Fish) या मांसाहाराला (Carnivory) एकीकडे मागणी वाढत आहे तर याचाच एक भाग म्हणून नेवासा शहरालगत आसलेला मध्यमेश्वर बंधारा अनेकांच्या उपजिविकेचे साधन बनला आहे.

नेवासा शहर (Newasa City) व नेवासा बुद्रुक (Newasa Budruk) या गावांच्या मध्यावर असलेली प्रवरा नदी (Pravara River) दुतर्फा भरून वाहू लागल्याने या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अनेक अनेक तरुण मासेमारी (Fishing) करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

सध्या करोना महामारीने (Corona pandemic) हाहाकार घातलेला आहे. त्यामुळे अनेक तरुणांना या बंधार्‍यामुळे मासेमारी (Fishing) करणं सोपं जातं व दिवसभर जाळे टाकून पकडलेल्या माश्यांना बाजारात चांगला भाव व प्रतिसाद देखील मिळत आहे. काही खवय्ये तर काही करोना रुग्ण मांसाहारावर चांगला ताव मारत असल्याने अनेकांनी आपला कल मासेमारीकडे (Fishing) वळवला आहे.

धरण (Dam), बंधारे, ओढे-नाले भरून वाहू लागल्याने प्रवरा नदीला (Pravara River) येणार्‍या पाण्याच्या प्रवाहामुळे मोठ्या प्रमाणात मासे वाहून येत आहेत. मोठ्या आकाराचे मासे वाहून येत असल्याने गोरगरीब मच्छिमार सध्या खुश आहेत.

या प्रवाहामध्ये खेकडे, चिलापी, चोपडा, वाम, रावस आदी विविध प्रकारच्या माशांच्या प्रजाती आढळून येतात. एक मासा साधारण 9 ते 10 किलो वजनाचा असून येथील मासे, पुणे, मुंबई, कल्याण, डोबिवली, नाशिक, नगर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यात विक्रीसाठी नेले जातात.

मच्छिमारीसाठीच्या साहित्यांना मागणी

मासे पकडण्यासाठी लागणारे जाळे, गळ, थर्माकॉल, चप्पू, बांबू, नायलॉन दोरी आदी साहित्यांना सध्या मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. लहान-मोठे जाळे जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध असल्याने ग्रामीण भागात याला मोठी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com