अहमदनगर|Ahmedagar

शिर्डीसह अन्य ठिकाणी लग्न समारंभातून सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम लुटणार्या टोळीला स्थानिक अन्वेषण पोलीस पथकाने मध्यप्रदेश, नवी दिल्ली, हरियाणा या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी अगोदरच शिर्डी पोलीस ठाण्यात सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबई येथील एक कुटुंब लग्न समारंभासाठी आले असता त्यांच्याकडील 1 लाख 50 हजार रुपयांच्या बॅगेसह वाहने तसेच मोबाईल 23 लाख 33 हजार रुपयासह अंदाजे किंमत 24 लाख 83 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

1 डिसेंबर 2020 रोजी नवनीत हृदयनारायण मिश्रा, (रा. 402, ध्वनी सोसायटी, कांदीवली वेस्ट, मुंबई) हे त्यांचे मुलाचे लग्नाकरिता साई निम ट्री हॉटेल, शिर्डी येथे त्यांचे कुटुंबासह आले होते. लग्न खर्चासाठी त्यांनी 1,50,000/-रु. रोख रक्कम सोबत बॅगमध्ये आणलेली होती. रात्री 8 वा. लग्न झाल्यानंतर फोटो काढण्यासाठी ते स्टेजवर गेले, त्यावेळी त्यांनी रोख रक्कम असलेली बॅग बाजूस असलेल्या खुर्चीवर ठेवली होती.

फोटो काढल्यानंतर त्यांनी खुर्चीवर बॅग पाहिली असता ती मिळून आली नाही. सदरची रोख रक्कम असलेली बंग कोणीतरी अज्ञात गुन्हेगाराने चोरुन नेली होती. त्याबाबत फिर्यादी अनिल कूमार उपाध्याय, वय- 30 वर्षे, रा. कनकूरी रोड, शिवाजीनगर, शिर्डी यांनी शिर्डी पो.स्टे. येथे दिलेल्या फियादीवरुन गुरनं. फस्ट 760/2020, भादवि कलम 379 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर व जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्यामूळे मा. पोलीस अधिक्षक साो, अहमदनगर यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करुन तपास करण्याबाबत पोलीस निरीक्षक अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल कटके पथकातील सपोनि मिथून घुगे, पोसईं गणेश इंगळे, सफौ सोन्याबापू नानेकर, पोहेको दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोनासंदीप पवार, सुनिल चव्हाण, शंकर चौधरी, विशाल दळवी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ संदीप दरंदले अशांनी मिळून मध्यप्रदेश येथे जावून आरोपींची माहीती घेवून यांनी सदर गुन्ह्याचे तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना अशा प्रकारचे गुन्हे मध्यप्रदेश राज्यातील गुन्हेगार करीत असल्याची माहिती मिळाल्याने सदर माहितीचे आधारे सखोल व तांत्रीक तपास करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनिमिथून घुगे, पोसईं गणेश इंगळे, सफौ सोन्याबापू नानेकर, पोहेको दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोना संदीप पवार, सुनिल चव्हाण, शंकर चौधरी, विशाल दळवी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ संदीप दरंदले अशांनी मिळून मध्यप्रदेश येथे जावून आरोपींची माहीती घेवून आरोपी नामे गोलू सुमेर मोजा उर्फ सिसोदीया, मध्यप्रदेश, संदीप सुमेर झोजा उर्फ सिसोदीया, न्यु दिल्ली, यांना पिपलीयों, मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेवून सदर गुन्ह्याबाबत व गुन्ह्यातील इतर साथीदाराबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे साथीदारांची माहिती सांगून त्यांचे नावे सांगीतले.

त्यावरुन सदर साथीदार आरोपींचा शोध घेवून आरोपी नामे राथेशाम उदयराम राजपूत कुर, दिल्ली, विपीन राजपाल सिंग, नवी दिल्ली, गिरीराज दिनेशचंद शुक्ला, नवी दिल्ली, अनिल कमल सिसोदीया, मध्यप्रदेश, विशालकूमार बनी सींग, हरियाणा यांना देवास, मध्यप्रदेश येथून वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रोख रकमेपैकी 55,000 / रू. रोख रक्कम तसेच गुन्हा करण्यासाठी यापरलेली याहने 13,00,000/-रु. किं. ची हुंडाई कंपनीची व्हेन्यू कार नं. एमपी-09-सीसीएस-7450 व 9,00,000/-रु. किं. ची मारुती सुझुकी कंपनीची सफेद रंगाची बलेनो कार नं. एमपी-09-डब्ल्युजी-5813 तसेच 78,000/ रु. किं. चे वेगवेगळ्या कंपन्यांचे सहा मोबाईल फोन असा एकूण 23,33,000/-रु. किं. ची वाहने व रोख रक्कम जप्त करण्यात आलेले आहेत. या सर्व आरोपींना अहमदनगर येथे आणून मुद्देमालासह शिर्डी पो.स्टे. येथे हजर करण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.