माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या मागणीला राज्यपालांकडून सकारात्मक प्रतिसाद

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या मागणीला राज्यपालांकडून सकारात्मक प्रतिसाद

अकोले |प्रतिनिधी| Akole

आदिवासी शेतकर्‍यांना भात, नागली, वरई लावणी लागवडीचा कार्यक्रम रोजगार हमी योजनेतून घ्यावा राज्यात ही योजना आदर्शवत ठरेल अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव पिचड (Madhukarrao Pichad) यांनी राज्यपाल (Governor) यांचेकडे केली होती. त्याच्या मागणीची दखल राजभवनाने घेतली असून 23 जून रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी भात लागवड, वरई, नाचणी लागवड आणि बैलजोडीने नांगरणी करणे ही सर्व कामे रोजगार हमी योजनेतून मंजुरीबाबत अप्पर मुख्य सचिव नियोजन विभाग मंत्रालय यांचेकडे उचित कार्यवाही साठी पाठविले आहे.

याबाबत राज्यपाल यांना पाठविलेल्या पत्रात माजी मंत्री पिचड यांनी म्हटले, महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये करोनामुळे आदिवासी जनतेवर मोठे संकट कोसळलेले आहे.(Corona caused a great crisis to the tribal people) त्यात रोजगार बुडाल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यावर आपण आदिवासी भागासाठी खावटी योजना सुरू केली त्याबद्दल धन्यवाद. परंतु आपल्या आदिवासी शेतकर्‍यावर भात लावणी, नाचणी लावणीचे मोठे संकट उभे राहिलेले आहे. भात लागवडीसाठी मजुराची व नांगरणी करण्यासाठी बैलाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत आहे.

त्याचप्रमाणे बैल औताची गरज आहे. काही ठिकाणी ट्रॅक्टरने नांगरणी करण्याची पध्दत आहे. त्यामुळे भात व नाचणी, वरई लागवडीसाठी नाईलाजाने सावकरांकडे कर्जासाठी जाण्याची वेळ येत आहे. म्हणून माझी आपणास विनंती आहे आदिवासी जिल्ह्यात (tribal district) किमान आदिवासी शेतकर्‍यांची भात लागवड (आवणी) त्याचप्रमाणे नागली, वरई लागवडीचा कार्यक्रम (Cultivation program) हा रोजगार हमी योजनेत घेण्यात यावा व त्याचप्रमाणे बैलाची नांगरणी, ट्रॅक्टर नांगरणी याचाही रोजगार हमीमध्ये समावेश करून किमान शेतीची लागवड होईल हा आपणास तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.

15 जून नंतर भात, वरई व नाचणी लागवडीचा कार्यक्रम सुरू होत असतो त्यामुळे सर्व कामे रोजगार हमी योजनेत समाविष्ट करावेत म्हणजे आदिवासी शेतकर्‍यांवर आलेले संकट दूर होण्यास मदत होईल, तरी कृपया या सर्व कामांना त्वरीत मंजुरी देण्यात यावी, असे नमूद केले होते. योजना योग्य पद्धतीने सुचविल्याने त्यावर लगेचच राज्यपाल यांनी नियोजन विभागाला (Planning Department) याबाबत कार्यवाहीसाठी आदेश दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com