काँग्रेस पक्षच अकोले शहराच्या विकासाचा शिल्पकार ठरेल- नवले

काँग्रेस पक्षच अकोले शहराच्या विकासाचा शिल्पकार ठरेल- नवले

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीद्वारे काँग्रेस पक्ष अकोले शहराच्या विकासाचा शिल्पकार ठरेल, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक मधुकरराव नवले यांनी व्यक्त केले आहे.

निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने स्वबळावर घेतलेला सहभाग ही तालुक्यातील लक्षवेधी ठरलेली बाब आहे. मागील 13 जागांवर झालेल्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचार सभा अथवा प्रचार मोहिमा या काँग्रेस पक्ष, पक्षाची विचार प्रणाली व पक्षाची तत्वशुद्ध भूमिका विषद करतानाही नागरिकांनी कौतुक केले आहे.

दि. 18 जानेवारी 2022 रोजी होत असलेल्या चार जागांसाठीही पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत. वॉर्ड क्र. 4 मध्ये फैजान शमसुद्दीन तांबोळी, वॉर्ड क्र. 11 मधे वनिता रामदास शेटे, वॉर्ड क्र. 13 मधे कर्णिक अंजली स्वप्निल तर वॉर्ड क्र. 14 मधे राजेंद्र यादवराव नाईकवाडी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस पक्ष या नगरपंचायतीच्या निवडणुकीद्वारे अकोले शहराच्या विकासाचा शिल्पकार ठरेल अशीच कामगिरी पक्ष पार पाडणार आहे. नागरिकांना सेवा सुविधा देण्यात नगरसेवक उत्साहाने काम करतील याची आम्हास खात्री आहे,असा विश्वास ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, रमेश जगताप, प्रा. बाळासाहेब शेटे, शिवाजीराव नेहे, विक्रम नवले आदींनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com