आमदार साहेब..पण थोडा 
विश्वास ठेवा - मधुकरराव नवले

आमदार साहेब..पण थोडा विश्वास ठेवा - मधुकरराव नवले

अकोले |प्रतिनिधी| Akole

आमदार साहेब इतर नवले प्रेम करतात तेवढेच मधुकरराव नवले ही करतील पण थोडा विश्वास ठेवा. आश्चर्य वाटते आमदारांचे अडीच वर्ष विधानसभेला झाले मात्र अकोले शहराचा कळीचा मुद्दा पिण्याचे पाण्याचा प्रश्न, याकडे अद्याप लक्ष दिले नाही. काही प्रयत्न केले का अडीच वर्षात? दळणवळणाचे प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रयत्न केले का? बायपास चा प्रयोग केला का? धरणात मुबलक असताना प्रवरेला केवळ पाणी शेतीसाठी सोडले जाते मात्र पिण्यासाठी पाणी सोडले जात नाही यावर आमदार का बोलत नाही? असे विविध प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा बँकेचे संचालक मधुकरराव नवले यांनी लोकप्रतिनिधी आ. डॉ. किरण लहामटे यांचे नाव न घेता केली.

अकोले नगरपंचायत चार प्रभागातील काँग्रेस आर.पी.आय (गवई गट) युतीचे उमेदवारांचे प्रचाराचा शुभारंभ आज अगस्ती महाराज मंदिरात नारळ वाहून करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले बोलत होते. अध्यक्षस्थानी रामनाथ नाईकवाडी होते तर काँग्रेस तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, मिनानाथ पांडे, सोन्याबापु वाकचौरे, भाऊसाहेब नाईकवाडी, आरीफ तांबोळी, माजी नगराध्यक्षा सौ. संगिताताई शेटे, बाळासाहेब नाईकवाडी, शिवाजीराव नेहे, विक्रम नवले, संपतराव कानवडे, साईनाथ नवले, मंदाताई नवले, यादवराव नाईकवाडी, मनिषा शेंगाळ, अमोल नाईकवाडी, शहनवाज शेख, पी. एम. नवले, प्रभाग 11 मधील उमेदवार वनिता रामदास शेटे, प्रभाग 13 अंजली स्वप्निल कर्णिक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे म्हणाले, तालुक्यात कोण सत्ताधारी व कोण विरोधक हेच कळत नाही. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री असले तरी राज्यात काँग्रेस पक्षाशिवाय सरकार चालुच शकत नाही. हे लक्षात ठेवावे. काँग्रेस पक्षाला बी टीम म्हणून राहायची गरज नाही. तालुक्यातील प्रश्नासाठी शिवसेनेने कोणते शिष्टमंडळ मंत्रालयात नेले ते सांगा तेव्हा बोलायला लावु नका. आज जे काँग्रेसवर टीका करताय 19 तारखेला लोटांगण घालत येतील तेव्हा आम्ही काय करायचे ते पाहू आमदारांनी नुसतेच मागच्यावर बोलत बसु नका तालुक्यातील पुढे आलेली प्रश्न सोडवा असा सल्ला पांडे यांनी दिला.

यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, आरिफ तांबोळी, मीनाक्षी शेंगाळ, प्रभाग 4 चे उमेदवार फैजान तांबोळी व प्रभाग 14 चे उमेदवार राजेंद्र नाईकवाडी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे वतीने नगरपंचायत निवडणूक जाहीरनामा मान्यवरांचे हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. बाळासाहेब शेटे यांनी केले. आभार संपत कानवडे यांनी मानले.

याप्रसंगी सुजित नवले, सतिषराव पाचपुते, अविनाश शेटे, नानासाहेब नाईकवाडी, रामदास धुमाळ, विशाल शेणकर, सचिन जगताप, मयुर शेटे, सुमन जाधव, विष्णु कर्णिक, विजय नाईकवाडी, संतोष देठे, शाहरुख शेख आदि उपस्थित होते.

सोशल मिडियावर एका किर्तनकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात किर्तनकार म्हटले आहे कि एक कुत्रा अमेरीकेतुन अकोलेत आला. त्याला विचारले कि तु अमेरिकेतून सर्व खंड, देश सोडून अकोलेत का आला तर त्याचे उत्तर होते कुणावरही कधीही भुंकण्याचे अधिकार फक्त अकोलेतच आहे सांगत ज्येष्ठ काँग्रेस नेते मधुकरराव नवले यांनी टीका करणार्‍यांना टोला लगावला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com