
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
‘चैतन्य कानिफनाथ महाराज की जय’ असा जय घोष करत कैकाडी समाजाची मानाची काठी कळसाला व समाधीला भेटून श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथांचा यात्रा उत्सवाची आज पासून खर्या अर्थाने सुरुवात झाली.
होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत कानिफनाथाची यात्रा चालतो. सोमवार (दि.6) सकाळी कैकाडी समाजाची मानाची काठी वाजत गाजत, नाथांचा जयजयकार करत मंदिराच्या कळसाला भेटवून मढी यात्रेस प्रारंभ झाला. रविवारी रात्री पाथर्डी शहरातून वाजतगाजत मानाच्या काठीची मिरवणूक निघाली. डफांचा पारंपारिक ताल व नाथ संप्रदयाची विविध वैशिष्टये असलेली मिरवणूक रात्रभर मिरवत सकाळी मढीला आली. ग्रामप्रदक्षिणा करत धार्मिक विधी झाल्यानंतर सकाळी दहा वाजण्याचा सुमारास मानाची काठी कळसाला लागली. त्यांनतर अमावस्येपर्यंत 15 दिवस विविध गावांचे भाविक येऊन मंदिराच्या छोट्या कळसाला काढ्या लावून मढीची वारी पूर्ण करतात.
कैकाडी समाजाचे मानकरी नारायण बाबा जाधव, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, गोकुळ दौंड, मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड, सरपंच संजय मरकड, मढी देवस्थानचे कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, सहसचिव शिवजीत डोके, विश्वस्त अर्जुन शिरसाठ, रवींद्र आरोळे, नवनाथ मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, देविदास मरकड, हनुमान माने, रूपचंद गायकवाड, ज्ञानेश्वर जाधव, अशोक जाधव, राजेंद्र जाधव, बाळू जाधव, बबन जाधव, बाळु बन्सी जाधव, रोहिदास जाधव, मल्हारी गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, सोमनाथ जाधव, रवी गायकवाड, अमोल माने, भानूविलास मरकड, बाळासाहेब मरकड आदी उपस्थित होते. मानकरी नारायण जाधव व बाळासाहेब यांचा देवस्थान समितीतर्फे सन्मान करण्यात आला. येणार्या भाविकांचे देवस्थान समितीने स्वागत केले.