मढी-मायंबा ‘रोप-वे’ ने जोडणार

मढी-मायंबा ‘रोप-वे’ ने जोडणार

45 कोटी रुपये खर्चाचा संयुक्त उपक्रम

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

देशातील नाथभक्तांच्या सोयीसाठी मढी व मायंबा देवस्थान समितीकडून संयुक्त उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. सुमारे 45 कोटी रुपये खर्चून दोन्ही देवस्थानांना जोडणारा रोप-वे केला जाणार असून हा राज्यातील एकमेव उपक्रम ठरणार आहे.

आ. सुरेश धस यांच्या पुढाकाराने दोन्ही देवस्थान समित्यांच्या पदाधिकार्‍यांची बैठक नुकतीच पार पडली. मायंबा देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, मढी देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड, बबन मरकड, शिवजीत डोके आदी बैठकीला उपस्थित होते.

गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये श्री क्षेत्र वृध्देश्वर येथे नाथ संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. येथून जवळच नाथ संप्रदायाचे आद्य मच्छिंद्रनाथांची संजीवनी समाधी मायंबा (सावरगाव) येथे आहे. भाविक मढीवरून दहा किलोमीटरचा घाट रस्ता पायी चालत मायंबाला जातात. धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्ग पर्यटनाला असलेला प्रचंड वाव व यातून संपूर्ण परिसराचा होणारा सर्वांगीण विकास डोळ्यापुढे ठेवून दोन्ही देवस्थान समित्यांनी संयुक्त विकास कामांचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात यासाठी पुन्हा बैठक आयोजित केली जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com