अन् बनावट लग्नाचे पितळ पडले उघडे!

पाच जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल : महिलेचे यापूर्वीच झाले होते लग्न
अन् बनावट लग्नाचे पितळ पडले उघडे!

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

लग्नाचे आमिष (lure of marriage) दाखवून मुलाची व त्याच्या नातेवाईकांची फसवणूक (Cheating relatives) करणारी टोळी उघडकीस आली आहे. लग्नात नववधू म्हणून उभ्या राहिलेल्या महिलेचे आधीच लग्न झाले असून तिला दोन अपत्ये असल्याचे नुकतेच समोर आले आहे.

या प्रकरणी नववधू म्हणून वावरणारी दीपाली बडदे (सासवड, पुणे), बापू झुंबर दातीर (औटेवाडी, श्रीगोंदा), कुंडलिक शाहू चव्हाण, अनिता भगवान गिरे (दोघे रा. औरंगाबाद) व वैशाली (पूर्ण नाव माहीत नाही) या पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करन्यात आला आहे.

पिंपरखेड ता. जामखेड (Pimparkhed Tal. Jamkhed) येथील ज्ञानेश्वर मोहन ढवळे यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदवली आहे. यातील बापू दातीर याने फिर्यादीचे वडील मोहन ढवळे यांच्याशी संपर्क साधून ‘तुमच्या मुलाचे लग्न करायचे असल्यास एक स्थळ आहे. मुलीला पाहण्यासाठी तुम्ही मुलाला श्रीगोंदा (Shrigonda) येथे घेऊन या’ असे सांगितले. त्यानंतर ढवळे कुटुंबीय 16 जून रोजी मुलगी पाहण्यास श्रीगोंदा येथे आले. मुलगी पसंद झाल्यानंतर 19 जून रोजी हा विवाह पार पडला. हे लग्न जमवताना आरोपी दातीर याने मुलाच्या वडिलांकडून दोन लाख रुपये घेतले होते.

दोन दिवस गेल्यानंतर वधू सतत फोनवर कुणाशी तरी बोलत असल्याचे मुलाच्या आईच्या लक्षात आले. त्यांनी तिच्याकडे असणारा मोबाईल काढून घेतल्यानंतर नववधू ढवळे कुटुंबियांवर चिडचिड करू लागली. तिथून पळून जाण्यासाठी तिने आई आजारी असल्याचा बहाणा केला. ढवळे कुटुंबियांनी तिच्यासोबत येण्याची तयारी दर्शवली. दरम्यान आरोपी वैशाली हिने मी दीपालीला घेण्यासाठी येते असे सांगितले. त्यावर ढवळे कुटुंबियांनी त्यास नकार दिला.

आपला कुठलाच प्लॅन यशस्वी होत नसल्याचे लक्षात येताच नववधू दीपालीने आपल्याला इथे रहायचे नसल्याचे सांगत तिथून जाण्याचा प्रयत्न केला. ढवळे कुटुंबियांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात (Police Station) धाव घेत पोलीस निरीक्षक रामराव ढिकले (PI Ramrav Dhikale) यांना कैफियत कथन केली. ढिकले यांनी याप्रकरणी लक्ष घालत वरील आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.

पैशांऐवजी हाती आल्या बेड्या...

लग्न झाल्यानंतर या वधूने तीन दिवसांनी माहेरी जाते असे सांगून तिथून पळ काढायचा असा वरील सर्वांचा प्लॅन होता.लग्नात नववधूच्या अंगावर घातलेले दागिने आरोपी वैशालीला द्यायचे त्यानंतर दोन लाखांतील पंधरा हजार रुपये नववधूला मिळणार होते.या टोळीने विविध ठिकाणी अशा प्रकारची मोडस वापरून तरुण मुलांना लाखो रुपयांचा गंडा घातला असण्याची शक्यता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com