लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

पीडित तरूणीचा मृत्यू; तरूणावर गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तरूणीवर अत्याचार (Atrocities on young women) केल्याने तिची गर्भधारणा (Pregnancy) झाली. त्यामुळे तिचा गर्भपात (Abortion) व्हावा याकरिता तिला डॉक्टरांच्या सल्लयाशिवाय गोळ्या दिल्या. त्यामुळे तिचा मृत्यू (Death) झाला. नगर शहरात (Nagar City) ही घटना घडली. याप्रकरणी सईद ताहेर बेग (वय 33 रा. काटवन खंडोबा) याच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. पिडीत मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे.

वडीलासह नगर शहरातील (Nagar City) एका उपनगरात राहणार्‍या 21 वर्षीय तरूणीला सईद बेग याने लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून प्रेमसंबंध ठेऊन तिच्या इच्छे विरूध्द तिच्यावर अत्याचार (Atrocities) केला. त्या तरूणीने सईदकडे लग्न करण्याबद्दल विचारणा केली असता त्याने तिला उडवाउडवीचे उत्तर दिले. सईद याचे या पुर्वी दोन लग्न झाले होते. असे असताना त्याने अविवाहित असल्याचे सांगितले अन गोड बोलून तिच्याशी तिच्या इच्छेविरूद्ध अत्याचार केला. त्यातुन ती तरूणी गर्भवती झाली.

तिला वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ व शारीरिक छळ केला. तिचा गर्भपात व्हावा म्हणून गर्भ पाताच्या गोळ्या दिल्या. तरूणीला त्रास होऊ लागल्याने तिला उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com