एकाच दिवसात 96 जनावरे ‘लम्पी’च्या विळख्यात

धाकधूक वाढली || दोन लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण

संगहीत चित्र
संगहीत चित्र

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दिवसेंदिवस जिल्ह्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून काल (बुधवारी) 96 जनावरांना याची लागण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण 105 गावात बाधित जनावरांची संख्या 454 पर्यंत पोहचली आहे. असे असले तरी जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवारपर्यंत 221 जनावरांवर उपचार करून त्यांना बरे करण्यात आले असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

लम्पीचा संसर्ग वाढू नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. बाधित गावाच्या पाच किलो मीटरच्या परिघातील जनावरांचे लसीकरण करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. 561 गावांत सहा लाख 13 हजार 349 जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत दोन लाख 99 हजार 298 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दरम्यान 217 जनावरांवर उपचार करण्यात आले असून 221 बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 17 जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पीपासून बचावासाठी जनावरांच्या गोठा आणि अन्य ठिकाणी धूराची फवारणी (फॉगिंग) करण्यात येत आहे. जिल्ह्यात आता सर्व तालुक्यात लम्पीमुळे बाधित झालेली जनावरे आहे. लम्पीचा संसर्ग वाढू लागल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी पशूसंवर्धन विभागाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com