लाळ्या खुरकत व लंपी; लसीकरण आणि उपाय आवश्यक

सहा. पशुधन विकास अधिकारी डॉ. पंडुरे : दूध उत्पादकांनी काळजी घेण्याचे आवाहन
लाळ्या खुरकत व लंपी; लसीकरण आणि उपाय आवश्यक

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

पशुधनास आजार झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा आजारच होवू नये म्हणून रोगप्रतिबंधक लसीकरण करुन किंवा आजाराचा प्रतिबंध करुन काळजी घेतली तर शेतकर्‍यांच्या पशुधनाचे होणारे नुकसान, उत्पादनात घट, अर्थिक खर्च यापासून निश्चित बचाव करु शकतो, असे मत अस्तगाव पशुवैद्यकीय केंद्राचे सहा. पशुधन विकास अधिकारी डॉ. उमेश पंडुरे यांनी व्यक्त केले.

काही ठिकाणी लाळ्या खरकूत व लंपी आजाराचा प्रादूर्भाव होवू नये म्हणून जनावरांची विशेष काळजी घेणे जरुरी आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अहमदनगर डॉ. सुनिल तुंबारे, व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हरिश्चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यतील सर्व पशुधनासाठी सरकारी, खाजगी पशुवैद्यक व सेवा दाता यांच्या मार्फत लाळ्या खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहिम चालु आहे.

शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून गायी म्हशींच्या दूधाच्या उत्पादनावर व काही कुटूंब फक्त दूध धंद्यावर उदारनिर्वाह करतात. यासाठी साखर कारखान्याकडे बाहेर गाववरुन येणार्‍या उस तोड कामगारांच्या जनावरांपासून या रोगाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी लाळ्या खुरकत लसीकरण करु घ्यावे व आपल्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

नवीन लंपी स्कीन डिसीज रोगाची लक्षणे जनावरांच्या त्वचेवर गाठी, डोळे, मान, पाय, मायांग, कासेच्या भागात कमी अधिक प्रमाणात 10-50 मिमी व्यासाच्या गाठी येतात. काही जनावरांत पायावर सुज येणे, जनावरे लंगडतात, लंपी स्किन डिसीज रोगाचे नियंत्रणासाठी आजारी जनावरांच्या संपर्कातील जनावरांना आयव्हरमेक्टीन इंजेक्शन दिल्यास किटक नियंत्रण होवुन रोग प्रसारण काही प्रमाणात आळा घालु शकतो. या आजारावर नियंत्रणांसाठी जनावरांच्या संपर्कात आलेले साहित्याचे निर्जंतुकीकरण, वाहनांचे निर्जंतुकीकरण व परिसर निर्जेंतुकीकरण करण्यासाठी सोडीयम हायपोक्लोराईट, द्रावण वापरुन निर्जेंतीकरण करावे.

लंपी आजाराचा प्रसार मुख्यत्वेकरुन किटकामुळे द्रावणाच्या माश्या डास, गोचिड, चिल्टे, निरोगी बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने चारा, पाणी दूशीत मुळे प्रसार होवू शकतो. लंपी स्किन डिसीज रोगाचे नियंत्रण करण्यासाठी बाधीत जनावरांना वेगळे करावे, बाधीत व निरोगी जनावरे एकत्रित चारावयास सोडू नये, लंपी आजाराचे निदानासाठी जनावरांची संख्या विषाणु वाहक माश्यांचे प्रमाण जनावरांचे अमर्याद स्थलांतरण, हालचाल यावरुन, ताप, शरीरावर गाठी, सुज यावरुन निदान करता व रोखता येते.

लंपी आजारामुळे होणार्‍या मरतुकीचे प्रमाण अत्ंयंत कमी आहे. रोगी जनावरे आशक्त, दूध उत्पादनात घट, गर्भपात, प्रजनन क्षमताघट, त्वचा खराब होते. या आजारावर नियंत्रणासाठी गोठा व परिसर स्वच्छ ठेवावा. हवेशीर वातावरण ठेवावे, गोठा परिसरात पाणी, डबके, साठणार नाही याची काळजी घ्यावी.

लंपी आजारात विशेष लस उपलब्ध नाही. हा आजार शेळ्या मेंढ्यांना होत नाही. आता पर्यंत तरी झालेला आढळून आलेला नाही. लंपी आजाराचा प्रादुर्भाव उष्म व दमट हवामानात किटकांची वाढ जास्त प्रमाणात आणि पावसाळ्यात अधिक प्रमाणात व हिवाळ्यात कमी प्रमाणात दिसतो. लंपी रोगग्रस्त जनावरांचा मृत्यु झाल्यास मृतदेह आठ फुट खड्डा घेऊन पुरावा, असेही डॉ. पंडूरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com