शेवगाव तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला

शेवगाव तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला

शेवगाव | शहर प्रतिनिधि

तालुक्यात जनावरांच्या लम्पी सदृश्य आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला असून सध्या दररोज मोठ्या संख्येने जनावरे बाधित आढळून येत असल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे. पशु संवर्धन विभागाने याबाबत तातडीने हालचाल करून तालुक्याच्या ग्रामीण परिसरात लम्पी सदृश्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्नशील राहून शेतक-यांना दिलासा देण्याची मागणी शेतक-यातून होत आहे.

जनवरांच्या लम्पी सदृश्य आजाराची साथ सुरु झाल्यापासुन तालुक्यात आत्तापर्यंत ६७९ जनावरे बाधित आढळून आली असून यापैकी ४२२ जनावरे उपचारानंतर बरी झाली असून सध्या २३६ जनावरांवर उपचार सुरु असल्याची माहिती तालुका पशु संवर्धन अधिकारी डॉ.चारू दत्त असलकर यांनी दिली.

साथीच्या या आजाराने तालुक्यात आत्तापर्यंत २१ जनावरे मृत्युमुखी पडली असून त्यात गाय, बैल, वासरू अशा विविध प्रवर्गातील जनावरांचा समावेश असून तालुक्यातील भातकुडगाव येथे ४, शेवगाव व भायगाव येथे प्रत्येकी ३, दहीगावने, कोनोशी येथे प्रत्येकी २, तर सुलतानपूर बु, मजलेशहर, देवटाकळी, वडुले बु, सुकळी, दहिफळ व हातगाव येथे प्रत्येकी १ अशा मृत्युमुखी पडलेल्या गावातील जनावरांची संख्या असल्याची माहिती पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आली.

पशुसंर्वधन उपायुक्त डॉ.सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, डॉ.संजय कुमकर, पशुसंवर्धन तज्ञ डॉ.मनोज शिंदे आदींनी तालुक्यातील विविध गावांना भेटी देवून तालुका पशुसंवर्धन विभागातील अधिकारी कर्मचा-यांना साथीचा फैलाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनाबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केल्याची माहिती पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com