लम्पी आजाराबाबत समाज माध्यमातून अफवा पसरविणारांचा बंदोबस्त करा

लम्पी आजाराबाबत समाज माध्यमातून
अफवा पसरविणारांचा बंदोबस्त करा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सध्या जनावरांमध्ये लम्पी या चर्मरोगाची लागण झाली आहे. काहीजण लम्पी रोगाचा कोंबड्यांनाही प्रादुर्भाव होत असल्याच्या अफवा समाज माध्यमातून पसरवत आहेत. यामुळे गैरसमज निर्माण होऊन त्याचा आर्थिक फटका कुक्कुटपालन करणार्‍या शेतकर्‍यांना होत आहे. यामुळे अशा अफवा पसरविणारांचा बंदोबस्त करावा तसेच पशुसंवर्धन विभागाने याबाबत जनजागृती करावी, अशी मागणी बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी केली आहे.

श्री. खंडागळे म्हणाले की, लम्पी हा विषाणूजन्य चर्मरोग आहे. त्याची बाधा फक्त गोवंश प्रकारातील जनावरांना होते. याव्यतिरिक्त हा रोग मनुष्य अथवा पक्षांना म्हणजे कोंबड्यांना होत नाही. असे पशुसंवर्धन विभाग तसेच पशुतज्ञांनी स्पष्ट केले आहे. असे असताना काहीजण कोंबड्यांचे खोटेनाटे फोटो बनवून लम्पी आजार कोंबड्यांनाही होत असल्याच्या अफवा पसवित आहेत.

यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे. कोंबड्या व अंड्याचे भाव गैरसमजामुळे घसरले आहेत. त्यामुळे कुक्कुटपालन करणारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे पशुसंर्धन विभागाने याबाबत जनजागृती करावी तसेच अफवा पसरविणार्‍यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी श्री. खंडागळे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com