
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यात रविवारी देखील लम्पी रोगाच्या प्रार्दुभाव कायम असल्याचे पशूसंवर्धन विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले. काल नव्याने 269 लम्पीग्रस्त जनावरे समोर आले असून मृतांचा आकडा देखील 11 ने वाढला आहे. दुसरीकडे 1 हजार 222 जनावरांनी लम्पीवर मात केली आहे.
जिल्ह्यात गेल्या 20 ते 25 दिवसांपासून लम्पी रोगाचा गायी आणि म्हशी प्रकोप पहावयास मिळत आहे. पशूसंवर्धन विभगाने लसीकरणासह अन्य उपाय योजना आणि प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत. मात्र, लम्पीचा संसर्ग कमी होण्याचे नाव घेण्यास तयार नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 488 जनावरांना लम्पीची बाधा झालेली आहे. यापैकी 1 हजार 222 जनावरांनी त्यावर मात केली असून मृतांचा आकडा आता 93 झाला आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात 977 गावे ही लम्पीच्या रेंजमध्ये असल्याने या ठिकाणी असणार्या 10 लाख 62 हजार 56 जनावरांचे लसीकरण पशूसंवर्धन विभागाने हाती घेतले आहे. यापैकी 7 लाख 39 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे पशूसंवर्धन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.