लम्पीग्रस्त जनावरांची संख्या 211

14 गायींचा मृत्यू || 295 गावात लसीकरण होणार
लम्पीग्रस्त जनावरांची संख्या 211

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लम्पी स्किन या रोगाला थोपवण्यासाठी पशूसंवर्धन विभागाने जोरदार लसीकरण मोहिम सुरू केली आहे. मात्र, लम्पीग्रस्तांचा आलेख कमी होण्योएवजी वाढतांना दिसत आहे. दोन दिवसात जिल्ह्यात नव्याने लम्पीचे रुग्ण आढळले असून यामुळे रोगग्रस्तांची संख्या आता 211 वर पोहचली आहे. तर 14 गायी लम्पीने दगावल्या आहेत.

राज्यात लम्पीचा प्रभाव वाढतांना दिसत आहे. यात नगर जिल्हा अव्वलस्थानी असल्याचे पशूसंवर्धन विभागाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत लम्पीचे 14 बळी ठरले असून यात कर्जत 4, अकोले 1, श्रीरामपूर 2, राहुरी 3, राहाता 2, पारनेर 1 आणि पाथर्डी तालुक्यातील एका जनावराचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 59 गावात लम्पी रोगाची लागण झालेली जनावरे आढळली आहे. या गावांच्या पाच किलो मीटरच्या परिघात 295 गावातील 3 लाख 41 हजार जनावरांचे लम्पी प्रतिबंत्मक लसीकरण करण्यात येणार आहे. तर आतापर्यंत 1 लाख 75 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा पशूसंवर्धन विभागाच्यावतीने देण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com