एका दिवसात नगर जिल्ह्यात 368 जनावरांना लम्पीची बाधा

पाच लाख 66 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण
एका दिवसात नगर जिल्ह्यात 368 जनावरांना लम्पीची बाधा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात लम्पी बाधित जनावरांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. मंगळवारपर्यंत 998 जनावरे बाधित होती. यामध्ये बुधवारी 368 बाधित जनावरांची भर पडल्याने हा आकडा एक हजार 366 वर पोहचला आहे. यातील 479 जनावरांनी लम्पीवर मात केली असली तरी दैनदिन बाधित होणार्‍या जनावरांची संख्या वाढतच आहे.

दरम्यान लम्पी संसर्गाचा धोका असलेल्या सर्वच जनावरांचे लसीकरण करण्याचे आदेश शासनाने दिल्याने जिल्ह्यातील सुमारे 14 लाख जनावरांचे टप्प्याटप्याने लसीकरण करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. आतापर्यंत पाच लाख 66 हजार 82 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील 160 गावांमध्ये लम्पीचा संसर्ग झाला आहे. सध्या या गावातील 848 जनावरांवर उपचार सुरू आहेत.

बुधवारी लम्पी बाधितांचा आकडा एक हजार 366 वर पोहचला असून लम्पी पीडितांची संख्या वाढत असल्याने धोका वाढला आहे. दरम्यान जिल्ह्यात लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांची संख्या वाढत असून कालपर्यंत 39 जनावरांचा लम्पीने बळी घेतलेला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com