लम्पी बाधीत जनावरांची संख्या 117 वाढली

मृत जनावरांच्या संख्येत तीनची वाढ

संगहीत चित्र
संगहीत चित्र

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात दररोज नव्याने लम्पी बाधित जनावरांची संख्या वाढतांना दिसत आहे. यामुळे पशूसंवर्धन विभागाची धावपळ कमी होण्याचे नाव घेण्यास तयार नाही. सोमवार (दि.19) रोजी जिल्ह्यात लम्पी पीडितांची संख्या आता 845 झाली असून काल नव्याने 117 लम्पीग्रस्त जनावरे समोर आली आहेत. तर मृतांच्या संख्येत तीनची वाढ झाल्याने मृतांचा आकडा आता 33 झाला आहे.

जिल्ह्यात गेल्या 10 ते 15 दिवसांपासून लम्पीचा प्रकोप या जनावरांतील चर्म रोगाचा प्रकोप दिसत आहे. आतापर्यंत 791 गावात संशयीत लम्पी रोगाच्या भितीने पशूसंवर्धन विभागाने 8 लाख 60 हजार जनावरांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत नगर जिल्ह्यात 4 लाख 67 हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. सोमवारी 147 गावात लम्पीग्रस्त जनावरे आढळून आलेले असून गावाच्या पाच किलो मीटरच्या परिघातील 791 गावात लम्पीचे लसीकरण करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com