लम्पीने जनावरे दगावलेल्या शेतकर्‍यांना भरपाई द्यावी


संगहीत चित्र
संगहीत चित्र

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

लम्पी आजाराने सर्वत्र थैमान घातले असून या आजारामुळे शेतकर्‍यांची जनावरे मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. अशा शेतकर्‍यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. लम्पी आजारामुळे राज्यात अनेक जनावरे दगावली. दुभती जनावरेही यात बळी पडल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर गो-धनाचे नुकसान झाले आहे.

या आजाराची लस निर्माण करून ती लवकरात लवकर बाजारात येणे गरजेचे आहे. अनेक जनावरे कर्जाने घेतली असून कर्जाचे हप्ते सुरूच आहेत. लम्पीग्रस्त जनावरांचे दुधही धोक्याचे आहे. अशा जनावरांचे दूध बाजारात आणू नये. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यात लक्ष घालून जनावरे दगावलेल्या शेतकर्‍यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, तसेच जनावरांसाठी कर्जघेतलेल्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी अशी मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे, शहराध्यक्ष मंगेश छतवाणी, विजय जगताप, चिलिया तुवर, जे. एम. क्षीरसागर, प्रसाद गाढे, वसंत गायकवाड, सोपानराव पागिरे, मनोहर बागुल, शिवाजी फोफसे, अविनाश कणगरे, राजेंद्र जाधव, दत्तात्रय मंडलिक, रामदास सदाफळ, जयराम क्षिरसागर, गुरु भुसाळ, सोमनाथ जगताप, सुभाष यादव, बाळासाहेब जाधव, राजेंद्र पारधे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com