लम्पी : 730 बाधितांसह 49 जनावरांचा मृत्यू

लम्पी : 730 बाधितांसह 49 जनावरांचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून सुरू असणारा लम्पी या विषाणूजन्य आजाराच्या विळख्यातून जिल्ह्यातील पशुधन सुटेल असे दिसत नाही. जिल्ह्यातील सर्व जनावरांचे लसीकरण झाल्यानंतर देखील गेल्या 15 दिवसांपासून नव्याने बाधित होणार्‍या जनावरांचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढतच आहे. सोमवारी नव्याने 730 लम्पीग्रस्त जनावरे वाढली असून 49 जनावरांची मृतांच्या आकडेवारीत भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 220 गावांत लम्पीग्रस्त जनावरे असून या गावाच्या पाच किलो मीटरच्या पट्ट्यात 1 हजार 149 गावांत लम्पीचा धोका वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 32 हजार 656 जनावरांना लम्पीची बाधा झाली असून यातील 22 हजार 423 जनावरांनी लम्पीवर मात केलेली आहे. तर लम्पीमुळे 2 हजार 108 जनावरे मृत पावलेली आहे. मागील 15 दिवसांत लम्पीग्रस्त जनावरांच्या संख्येत कमालीची वाढ होतांना दिसत आहे. यामुळे जिल्ह्यातील पशूसंवर्धन विभागाच्या पाय गळाले आहे. पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी पायाला भिंगरी लावून ज्या भागात लम्पीचा उद्रेक होत आहे, त्याठिकाणी भेटी देवून उपचाराची पध्दत सांगत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com