453 बाधितांसह 32 मृत्यू वाढले

लम्पीचा संसर्ग सुरूच || चार हजार जनावरांवर उपचार सुरू
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 279 जनावरांना लम्पी चर्मरोगाची लागण झालेली आहे. यातील 5 हजार 779 जनावरांवर उपचार करून त्यांना लम्पीमुक्त करण्यात आले आहे. तर 3 हजार 925 जनावरांवर अद्याप उपचार सुरू असून 5 हजार 75 जनावरांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी नव्याने 453 लम्पी संसर्ग झालेली जनावरे समोर आली असून 32 जनावरांचा मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात लम्पीचा संसर्ग कायम आहे. पशुसंवर्धन विभागाकडून लम्पीचे लसीकरण सुरू असून 931 गावांत फॉगिंग करून लम्पीला रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 218 गावात लम्पीचे सक्रिय रुग्ण असून या गावाच्या पाच किलो मीटरच्या परिघात 1 हजार 127 गावे येत असून त्याठिकाणी पशुसंवर्धन विभाग सर्व गोवर्गीय जनावरांचे लसीकरण करत आहे. त्याचसोबत 931 गावात पूर्णपणे फॉगिंग करण्यात आलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com