178 बाधित आणि 9 लम्पी मृत्यू वाढले

कर्जत तालुक्यावर पशुसंवर्धनचे लक्ष || 3 लाख 31 हजार जनावरांचे लसीकरण बाकी
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात लम्पी संसर्गाचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेण्यास तयार नाही. मंगळवार (दि.27) रोजी नव्याने 178 जनावरांना लम्पीची बाधा झाली असून मृतांच्या आकडेवारीत 9 ची भर पडली आहे. सध्या 2 हजार 997 लम्पीने बाधित जनावरे असून 120 जनावरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यात लम्पीचा सर्वात मोठा उद्रेक झालेला असून त्याठिकाणी पशुसंवर्धन विभागाची 12 पथके कार्यरत आहेत.

जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यापासून सुरू झालेला लम्पीचा संसर्ग काही केल्याने कमी होताना दिसत नाही. लम्पी जनावरांमधील विशेष करून गाय आणि म्हशीमधील संसर्गजन्य तत्वाचा रोग आहे. डास, चिलट, माशा यांच्या मार्फत एका जनावरातून हा रोग दुसर्‍या जनावरात फैलावत असल्याने त्याचा झपाट्याने प्रसार होताना दिसत आहे. एखाद्या भागात लम्पीचे संसर्ग झालेल्या जनावरातून तो भटक्या जनावरांमार्फत दुसर्‍या जनावरांनपर्यंत पोहचत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 192 गावात लम्पी पोहचला असून यामुळे या गावाच्या परिघात पाच किलो मीटरपर्यंत असणार्‍या 1 हजार 10 गावातील जनावरांचे लसीकरण पशूसंवर्धन विभागाला करावे लागणार आहे. जिल्ह्यात लसीकरण होणार्‍या जनावंराची संख्या ही 11 लाख 15 हजार 645 असून यापैकी 7 लाख 83 हजार 816 जनावरांचे लसीकरण झाले असून 3 लाख 31 हजार जनावरांचे लसीकरण करण्याचे आवाहन पशूसंवर्धन विभागासमोर आहे.

कर्जतमध्ये लम्पीकडे दुर्लक्ष ?

कर्जतच्या राशिनमध्ये तेथील व्यापर्‍यांनी राजस्थानात लम्पीचा उद्रेक झाल्यानंतर कमी दरात गायी आणल्या होत्या. या सर्व गायींना लम्पीची बाधा झालेली आहे. यासह राशिनमध्ये भटक्या गायींची संख्या अधिक असून शेतकरी दिवसभर गाय चरण्यासाठी सोडून देतात आणि सायंकाळी केवळ दुध काढण्यासाठी त्यांना घेवून येतात. यामुळे राशिनमध्ये लम्पीचा उद्रेक झाल्याची चर्चा आहे. यासह कर्जत पंचायत समिती पशूसंवर्धन विभागाने सुरूवातीला लम्पीचा कर्जत तालुक्यात प्रसार वाढल्याची शेतकर्‍यांमध्ये चर्चा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com