आणखी चौघा लम्पीग्रस्त जनावरांचा मृत्यू

बाधितांची संख्या 728 || 385 जनावरांवर उपचार सुरू
आणखी चौघा लम्पीग्रस्त जनावरांचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात रविवारी सांयकाळपर्यंत आणखी चार जनावंराचा लम्पी रोगामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात लम्पीमुळे मृत पावलेल्यांची संख्या आता 30 झाली आहे. दरम्यान, काल आणखी 142 ठिकाणी लम्पीमुळे बाधित जनावरे आढळून आले असून जिल्ह्यात 343 जनावरांनी या रोगावर मात केली असून 385 जनावरांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात लम्पी रोगाचा विळखा दररोज आणखी घट्ट होतांना दिसत आहे. पशूसंवर्धन विभागाने रोगाच्या प्रार्दूभाव झाल्यापासून मोठ्या प्रमाणात जनावरांचे लसीकरण सुरू केले आहे. मात्र, दररोज लम्पी पिडीतांची संख्या वाढतांना दिसत आहे. यामुळे जिल्ह्यातील 767 गावातील 8 लाख 26 जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यातील 4 लाख 13 हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण होणे बाकी असल्याची संख्या मोठी असल्याने हे लसीकरण पूर्ण करण्याचे दिव्य पशूसंवर्धन विभागासमोर आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com