लम्पी स्किन दहा तालुके व्यापले

76 बाधित || 61 हजार 139 जनावरांचे लसीकरण होणार
लम्पी स्किन दहा तालुके व्यापले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सुरूवातीला अकोले आणि श्रीरामपूर तालुक्यात मर्यादित असणार्‍या गोवंशी जनावरांतील लम्पी स्किन आजाराने आता जिल्ह्यातील 10 तालुक्यात आपला पसारा वाढवला आहे. यामुळे पशूसंवर्धन विभागाची धावपळ वाढली असून लम्पी पिडीत जनावरे असणार्‍या गावातील पाच किलो मीटरच्यापर्यंतच्या जनावरांचे लसीकरण सुरू असण्यात आले आहे. लम्पीचे जिल्ह्यात 76 रुग्ण असून यामुळे 10 तालुक्यातील 61 हजार 139 जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाने तातडीने लसीकरणासाठी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून 30 हजार आणि शुक्रवारी (आज) 20 हजार अशा प्रकारे 50 हजार लस विकत घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत लम्पी स्किनचा मुकाबला करण्यासाठी लसींचा पुरवठा कमी पडणार याची दक्षता घेण्यात येत असल्याचे पशूर्सवंधन अधिकारी संजय कुमकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात सध्या 75 गायी आणि 1 म्हशीला लम्पीची बाधा झाली असून तर 10 तालुक्यातून 54 गावात जनावरांना लंम्पीची बाधा झाली आहे. या सर्व गावांच्या पाच किलो मीटरच्या परिघातील गायी आणि म्हशी लसीकरण पशूसंवर्धन विभाग करणार आहेत. आतापर्यंत 34 हजार 223 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असले तरी दररोज नव्याने लम्पी बाधीत जनावरांची संख्या वाढत असल्याने पशूसंवर्धन विभागाची अडचण वाढत आहे.

बाधीत गावे आणि कंसात जनावरे

अकोले 3 (15), श्रीरामपूर 7 (7), नेवासा 6 (6), राहुरी 15 (20), कर्जत 9 (9), संगमनेर 10 (10), पारनेर 5 (5), श्रीगोंदा 4 (4), पाथर्डी 1(5) असे आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com