एक्सपायर तुपामुळे सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान

साईबाबा संस्थानच्या प्रमुख अधिकान्यांविरोधात गुन्हे दाखल करा - काळे
एक्सपायर तुपामुळे सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान

शिर्डी (शहर प्रतिनिधी)

एक्सापायर झालेल्या गाईच्या शुद्ध गावरान तुपाचा जाहीर लिलाव करून साईबाबा संस्थान विक्री करण्याचा घाट घालत आहे. मात्र हे कायद्याविरोधात असून या एक्सपायर झालेल्या तुपामुळे दुसऱ्याच्या जीविताला धोका होऊ शकतो.

अशाप्रकारे वापराची अंतिम मुदत संपलेल्या तुपाची विक्री करणे हा गुन्हा आहे आणि हा प्रकार संस्थानच्या लक्षात का आला नाही ? असा सवाल करत एक्सपायर झालेल्या तुपामुळे सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान होऊन साईबाबांच्या तिजोरीला फटका बसला आहे. नुकसानभरपाई म्हणून सर्व पैसे संस्थांनच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावेत व एक्सपायर तुपाची जाहीर निविदा काढल्यामुळे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावरही कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी विधी व न्याय मंत्रालयाच्या प्रधान सचिवांकडे तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महोदयांकडे पत्राद्वारे केली आहे.

संजय काळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की श्री साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयातून भक्तांना लाडूचा प्रसाद दिला जातो. त्यासाठी शुद्ध गावरान तूप वापरले जाते. मात्र येथे वापरण्यात येणारे गाईचे गावरान तुपाची वापराची अंतिम मुदत संपलेली असताना ते मूळ खरेदी केलेल्या ते कंपनीला परत देणे गरजेचे होते. मात्र संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या लक्षात आले नाही. नंतर मात्र या एक्सपायर झालेल्या गाईच्या शुद्ध गावरान तुपाचा जाहीर लिलाव करून संस्थान विक्री करण्याचा घाट घालत आहे.

मार्च २०२० मध्ये करोनाचा प्रादूर्भाव वाढला. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार साईमंदिर बंद आले. यादरम्यान करण्यात आले. प्रसादालय तसेच लाडूप्रसाद बंद होते. डिसेंबर २०२० मध्ये शासनाने मंदिर मंदिर उघडण्यास परवानगी दिली व पुन्हा १६ एप्रिल २०२१ मध्ये मंदिर व प्रसादालय बंद झाले, संस्थानने यापूर्वी मे, हर्ष फ्रेश डेअरी भगवानपूर, हरिद्वार यांच्याकडून मदर डेरी प्रॉडक्ट कंपनीचे गाईचे शुद्ध गावरान तूप खरेदी केले. सदर तुपाची अंतिम वापराची मुदत ४ ऑक्टोबर २०२१ होती. असे असतांना सुमारे १४५४ डबे म्हणजेच २१८.१० क्विंटल हे गाईचे गावरान तूप संस्थानकडे शिल्लक होते.

या गावरान तुपाची वापराची अंतिम मुदत संपल्यानंतर देखील सुमारे ७५ लाख रुपये किमतीच्या व एक्सपायर झालेल्या २१८.१० क्विंटल गावरान तुप विक्री करणेकामी संस्थानने ई निवीदा कम ई लिलाव जाहीर नोटीस प्रसिद्ध केली. एक्सपायर झालेल्या खाद्यपदार्थ विक्री करण्याचा घाट संस्थान प्रशासनने घातला. हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या कायद्यांतर्गत गुन्हा असून एखाद्याने जर मुदत संपलेले गावरान तूप खरेदी केले व ते इतर तुपात मिसळून त्याची सर्वसामान्य जनतेला विक्री केली आणी त्यांच्या जीविताला धोका झाला तर याला जबाबदार कोण ? संस्थान प्रशासनाने अंतिम मुदत संपण्यापूर्वीच ते मूळ मालकाला परत देणे गरजेचे होते. मात्र तसे अधिकाऱ्यांनी केले नाही.

संस्थानच्या गावरान गाईच्या तुपाच्या १४५४ डब्यांची अंतिम मुदत संपली आणि ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले किंवा होणार आहे. यास जबाबदार कोण आहे ? असे सवाल करत संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुदत संपलेल्या गाईच्या तुपाची विक्री करण्याची निविदा प्रसिद्ध केली. त्यासंदर्भात भारतातील प्रचलित अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ चे कलम ७ व १६ प्रमाणे गुन्हा ठरतो व तो देखील दखलपात्र गुन्हा आहे. तसेच भादंवि २७३ प्रमाणे देखील कोणत्याही वस्तूची वापराचे मुदत संपलेली किंवा खाद्यपदार्थाची मुदत संपली त्यामुळे एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हा देखील दखलपात्र गुन्हा आहे. त्याचप्रमाणे रुल्स ऑफ पॅकेज १९७५ प्रमाणे देखील वापराची मुदत संपलेले गाईचे शुद्ध तूप वापरण्याचे कृत्य म्हणजे गुन्हा असल्याचे काळे यांनी पत्रात म्हटले आहे.

यास संस्थान प्रशासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी तसेच संबंधित विभागाचे प्रमुख हे हे जबाबदार आहेत. त्यांच्याकडून संस्थानचे गेलेले पैसे वसूल करण्यात यावे व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काळे यांनी राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडे तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडे एका पत्राद्वारे केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात शिल्लक राहिलेल्या गावरान तुपाचा वापर न झाल्याने ते तसेच पडून राहिले. त्यामुळे ते ते एक्सपायर झाले. ही गोष्ट मी पदभार स्विकारण्यापुर्वीची आहे. खाण्यासाठी चांगले आणि सुरक्षित पदार्थांची मुदत संपल्यानंतर ते वापरता येत नाही म्हणून खाण्यासाठी हे तूप विकले गेले नाही. सदरच्या टेंडरसाठी माझ्यापुर्वीच्या तदर्थ समितीची संमती घेऊन सर्व कायदेशीर बाब तपासून पूर्ण केली आहे. साईसंस्थान सदरचे गावरान तूप खाण्यासाठी म्हणून विकत नाहीये. विनाकारण संस्थानचे नुकसान होऊ देणार नाही.

भाग्यश्री बानायत मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com