डॉक्टरांना लुटणारा गजाआड

श्रीरामपूर शहर पोलिसांची काही तासात कारवाई
डॉक्टरांना लुटणारा गजाआड

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरातील लक्ष्मी टॉकीजजवळ असलेल्या डॉक्टरांना त्यांची कार अडवून त्यांना मारहाण करणार्‍या आरोपीस

श्रीरामपूर शहर पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे.

येथील प्रसिध्द त्वचारोग तज्ञ डॉ. रमेश गोसावी हे त्यांचा दवाखाना बंद करुन कारने घरी जाण्यास निघाले असता त्यावेळी एका जणाने त्यांची कार अडवून त्यांच्या गाडीची काच फोडली. त्यांना मारहाण करत त्यांचा चष्मा तोडला. तसेच त्यांच्याकडे असलेली रोख रक्कमही त्याने लुटली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात डॉ. रमेश गोसावी यांनी फिर्याद दाखल करुन शादाब शेख याचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत यातील आरोपी शादाब जावेद शेख यास काही तासाच्या आतच अटक केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com