प्रवासादरम्यान पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास

तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रवासादरम्यान पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास

अहमदनगर|Ahmedagar

प्रवासादरम्यान पती-पत्नीची बॅग चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या बॅगमध्ये सोन्याचे दागिणे, रोख रक्कम, एटीएम कार्ड व काही महत्वाची कागदपत्रे होती. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास मधुकर जगताप (रा. प्रतिकनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी व त्यांच्या पत्नी एका खाजगी बसमधून पुणे येथे चालले होते. त्याच्यासोबत एक बॅग होती. या बॅगमध्ये 1 लाख 35 हजार रूपयाचे मंगळसूत्र, 8 हजार 700 रूपये रोख, एटीएम कार्ड व महत्वाची कागदपत्रे होती. प्रवास करीत असताना बस नगर शहरातील कोठला येथे थांबली होती. त्याठिकाणीच फिर्यादी यांची बॅग चोरीला गेली. बॅगमध्ये असलेल्या एटीएम कार्डचा वापर करून चोरट्याने नगर शहरातून 21 हजार 500 रूपये काढून घेतले असा एकुण 1 लाख 65 हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला. बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घायवट करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com