लोणीत वेटरने घेतला हॉटेलमध्ये गळफास

लोणीत वेटरने घेतला हॉटेलमध्ये गळफास

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील शेर-ए-पंजाब हॉटेलमध्ये वेटरनेच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली.

लोणी-बाभळेश्वर रस्त्यालगत चित्रालय चौकात शेर-ए-पंजाब हॉटेल अनेक दिवसांपासून सुरू आहे. वेगवेगळ्या कारणाने ते चर्चेत असते. त्यातच ऐन दिवाळीच्या तोंडावर याच हॉटेलमध्ये गेल्या एक वर्षांपासून वेटर म्हणून काम करणारा रहीम शेख (वय-55) याने हॉटेलमधील त्याच्या राहण्याच्या खोलीत पंख्याला केबल बांधून रविवारी गळफास लावून घेतला.

सकाळी हॉटेल चालकाच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी लोणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन कार्यवाही सुरू केल्यानंतर रहीम जवळ त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिट्ठी सापडली. त्यात मालकाने आपल्यावर चोरीचा खोटा आळ घेतल्याने आपण आत्महत्या करीत आहोत, असे लिहून ठेवल्याची माहिती उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी दिली. दरम्यान ही चिट्ठी राहिमनेच लिहिली आहे का याची तपासणी पोलीस करीत असून त्यानंतर दोषींविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com