बोगस कागदपत्राद्वांरे दिले 20 लाखाचे कर्ज

लोणी व्यंकनाथ सोसायटीच्या चौकशीची मागणी
बोगस कागदपत्राद्वांरे दिले 20 लाखाचे कर्ज

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील लोणी व्यंकनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेने मयत सभासदांच्या नावे शेती असताना इतरांना बनावट कागदपत्रांद्वारे 20 लाखाच्या कर्जाचे वितरण करून शेतकरी सभासदांची फसवणूक केल्याचे समोार आले आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काही सभासदांनी उपोषण केले.

मौजे लोणी व्यंकनाथ येथील गट नंबर 7014 693 मधील क्षेत्र हे कोंडीबा दगडू खोमणे व बाबा कोंडीबा खोमणे या दोघा मयत सभासदांच्या नावे सातबारा पत्रकी आहे. अद्यापपर्यंत त्याच्या नावावरील जमिनीची वारस नोंद झालेली नसून त्यांचे नाव अद्यापि महसुल दप्तरी पत्रकी कायम आहे. असे असताना लोणी व्यकनाथ सेवा संस्थेने संगनमताने खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून सातबारा पत्रक बनावट नोंदी दाखवून मोहन खोमणे 6 लाख 50 हजार, ताराबाई खोमणे 4 लाख 50 हजार, स्वाती खोमणे 75 हजार, अनिल खोमणे 9 लाख रूपये असे पीक कर्ज वितरण केले आहे.

असे एकुण वीस लाख रुपये देऊन खोमणे व संस्थेतील काही पदाधिकार्‍यांनी सभासदांची फसवणूक केल्याचें निदर्शनास आलेआहे. याबाबात वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून व तक्रार अर्ज करून संस्थेने कोणतीच कारवाई केली नाही. यामुळे लवकर चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे गणपतराव काकडे, धर्मनाथ काकडे, संतोष जठार, दादासाहेब मडके, संदीप डांगे , राजेंद्र काकडे , भगवान पवार यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण कले. दरम्यान सहाकय निबंधकांनी चौकशी करण्याचे अश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com