लोणी व्यंकनाथचे वादग्रस्त सरपंच अखेर अपात्र

विभागीय आयुक्तांची कारवाई
लोणी व्यंकनाथचे वादग्रस्त सरपंच अखेर अपात्र

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

राजकीय द्रुष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या व राज्य बाजार समिती संघाचे सभापती असणाऱ्या बाळासाहेब नाहाटा यांच्या गावातील सरपंचाने मनमानी कारभार करुन पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवून व दाखल तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सरपंच रामदास ठोंबरे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, १४ व्या वित्त आयोगातील निधीतून कामे न करता रकमा काढणे. अंदाजपत्रकाप्रमाणे कामे न करणे काही ठेकेदारांना हाताशी धरून कामाच्या अगोदर आगावु रकमा काढणे. शासकीय रकमेचा अपहार करणे, कारण या तक्रारीत शेंडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संरक्षक भिंत बांधण्यासाठी १ लक्ष रुपये खर्च करायचा होता. पण या ठिकाणी कोणतेही काम न करता रकमा काढल्याचे चौकशीत सिद्ध झाले होते.

या सर्व बाबींचा विचार करून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी लोणी व्यंकनाथच्या सरपंच विरोधात अपात्रतेची कारवाई केली आहे. या ग्रामपंचायतीवर राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांचा वरचष्मा आहे. मात्र या कारवाईने लोणीतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com