लोणी व्यंकनाथच्या आजी - माजी सरपंचांचे जामीन अर्ज फेटाळले

ग्रामपंचायत आर्थिक गैरव्यवहार प्रकरण
लोणी व्यंकनाथच्या आजी - माजी सरपंचांचे जामीन अर्ज फेटाळले

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील लोणी व्यंकनाथ (Loni Venkanath) गावच्या ग्रामपंचायतमध्ये आर्थिक गैरव्यवहार ((Financial malpractice in Gram Panchayat) झाल्याचा गुन्हा दाखल असलेल्या आजी - माजी सरपंच यांचे अटकपुर्व जामीन अर्ज (Pre-Arrest Bail Application) जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन . जी . शुक्ल यांनी फेटाळले (Rejected) आहेत.

लोणी व्यंकनाथ (Loni Venkanath) गावचे माजी सरपंच संतोष चंद्रभान माने व विदयमान सरपंच रामदास बबन ठोंबरे दोघे (रा. लोणी व्यंकनाथ ता . श्रीगोंदा जि . अहमदनगर) हे सन 2018 ते 201 9 व सन 201 9 ते 2020 या कालावधीमध्ये ग्रामपंचायत (Grampanchayat) लोणी व्यंकनाथचे (Loni Venkanath) सरपंच (Sarpanch) पदावर कार्यरत असताना तत्कालीन सरपंच चंद्रकांत माने व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाउ काशीनाथ खामकर यांच्याशी संगनमत करून चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत कामात 26 लाख 88 हजार 352 रुपयांचा अपहार (Fraud) केल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात (Shrigonda Police Station) गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.

या प्रकरणात अटकपुर्व जामीन मिळण्यासाठी दोघा संशयितांनी श्रीगोंदा (Shrigonda) येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जामध्ये सरकारी वकील विष्णुदास भोर्डे यांनी पुढील युक्तीवाद केला. अशा आर्थिक गैर व्यवहारामध्ये जामीन देउ नये तसे झाल्यास गावामध्ये भ्रष्ट्राचार करुन आरोपीस जामीनावर सोडले जाते असा वेगळा संदेश जाईल. असा युक्तीवाद त्यांनी केला. हा युक्तवाद विचारात घेउन न्यायालयाने दोघांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत.

Related Stories

No stories found.