लोणी-पिंप्रीनिर्मळ रस्त्यावरील अपघातात व्यावसायिकाचा मृत्यू

लोणी-पिंप्रीनिर्मळ रस्त्यावरील अपघातात व्यावसायिकाचा मृत्यू

लोणी |वार्ताहर| Loni

पिंपरी निर्मळ येथून दुचाकीवरून लोणी बुद्रुक येथे घरी परतत असताना लोणी रस्त्यावर चारचाकी वाहनाची धडक बसून येथील व्यावसायिक दत्तात्रय रामराव घोरपडे यांचा अपघाती मृत्यू झाला.दत्तात्रय घोरपडे हे प्रगतिशील शेतकरी तर होतेच पण त्यांचे लोणी येथे मेडिकल स्टोअर व पिंप्री निर्मळ येथे पशुखाद्य विक्री व्यवसाय आहे.

नेहमीप्रमाणे पिंपरी येथील दुकान बंद करून दुपारच्या वेळी दुचाकीवरून घरी परतत असताना लोणी रस्त्यावरील निळवंडे कालव्यालगत समोरून आलेल्या चारचाकी वाहनाने रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीला जोराची धडक दिली.दत्तात्रय हे डांबरी रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. वाहन चालकाने इतर लोकांच्या मदतीने त्यांना प्रवरा रुग्णालयात नेले.

मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. दत्तात्रय हे 65 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गणेश मेडिकलचे संचालक गणेश घोरपडे यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने लोणी व पिंप्री निर्मळ परिसरात शोक व्यक्त करण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com