लोणीतून दोन लाखांच्या पीकअपची चोरी

लोणीतून दोन लाखांच्या पीकअपची चोरी

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथून रात्रीच्यावेळी उभी असलेली महिंद्रा पीकअप अज्ञात चोरट्याने चोरून नेली. तिची किंमत दोन लाख रुपये आहे. शौकत राजमोहंमद खाटीक या लोणी खुर्द गावात साई कॉलनीत राहणार्‍या व्यापार्‍याने लोणी पोलिसांत फिर्याद दाखल केली.

त्यात म्हटले आहे की, माझ्या मालकीची महिंद्रा मॅक्स पिकअप ही गाडी सोमवार दि. 22 रोजी रात्री नेहमीप्रमाणे घराजवळच्या बाभळेश्वर रस्त्यालगत लावली होती. दुसर्‍या दिवशी सकाळी माझी महिंद्रा पिकअप एमएच 06 एजी- 6338 रंग पांढरा व किंमत रु. 2 लाख अज्ञात चोरट्याने चोरून नेली. लोणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सपोनि समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिंदे पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com