लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जनार्धन चंद्रभान घोगरे यांची तर उपसरपंचपदी अर्चना अनिल आहेर यांची बिनविरोध निवड झाली.

लोणी खुर्द ग्रामपंचायतीत पंधरा वर्षांनंतर सत्तांतर झाले. राष्ट्रवादीचे एकनाथ घोगरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळाने 17 पैकी 11 जागा जिंकल्या तर आ. राधाकृष्ण विखे पाटील समर्थक जनसेवाला 6 जागा मिळाल्या. सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष राखीव असल्याने जनार्धन घोगरे पाटील सरपंच होणे निश्चित होते.

मंगळवारी निवडणूक अधिकारी श्री. भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीसाठी नूतन सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सरपंच पदासाठी परिवर्तन मंडळाचे जनार्धन घोगरे व उपसरपंच पदासाठी अर्चना आहेर या दोघांचेच अर्ज राहिल्याने त्यांना बिनविरोध घोषित करण्यात आले.

यावेळी एकनाथ घोगरे, बापूसाहेब आहेर, रणजित आहेर, संजय आहेर, आप्पासाहेब घोगरे, दादासाहेब घोगरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व नूतन सर्व सदस्य उपस्थित होते. नूतन पदाधिकार्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.