लोणी खुर्दच्या ग्रामसभेत विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर

लोणी खुर्दच्या ग्रामसभेत विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

लोणी खुर्द गावची ग्रामसभा रविवारी सरपंच जनार्दन घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ग्रामसभेत विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

ग्रामविकास अधिकारी गणेश दुधाळे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. त्यास ग्रामसभेची मान्यता घेण्यात आली. ग्रामसभेच्या अजेंड्यावर असलेल्या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. शासन निर्णय व ग्रामपंचायत अधिनियम तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यास ग्रामसभेने सर्वानुमते मान्यता दिली. यावेळी ग्रामसभेस गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, विस्तार अधिकारी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घोरपडे, कामगार तलाठी श्रीमती देवकर, कृषी अधिकारी शिंदे यांच्यासह अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका ग्रामसभेस हजर होते.

कृषीभूषण प्रभाताई घोगरे यांनी महाराष्ट्राला राजर्षी शाहू महाराज यांचा पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेला असून राजर्षीच्या स्मृती शताब्दी निमित्त आपल्या गावात विधवा महिलांना मानसन्मान मिळाला पाहिजे. पतीच्या निधनानंतर कुंकू न पुसता, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी ही सौभाग्य अलंकार कायम ठेवत समाजात विधवा मातेला सन्मानाने वागविण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. ती महिला कुणाची तरी आई, बहीण, पत्नी, मुलगी आहे याची जाणीव समाजातील प्रत्येक घटकांनी ठेऊन विधवा प्रथा बंद करावी, असे आवाहन केले. त्यांनी ग्रामसभेत मांडलेला विधवा प्रथा बंदीचा ठराव ग्रामसभेने सर्वानुमते मंजूर केला.

यावेळी ग्रामसभेस एकनाथ घोगरे, उपसरपंच अर्चना आहेर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, लोणी खुर्द सेवा संस्थेचे संचालक यांच्यासह आबासाहेब आहेर, शांतीनाथ आहेर, राजेंद्र आहेर, श्रीकांत मापारी, अशोक आहेर, संजय आहेर, रायभान आहेर, उत्तम घोगरे, राजेंद्र घोगरे, सचिन आहेर, बाळासाहेब आहेर, आप्पासाहेब घोगरे, दिलीप आहेर, कैलास आहेर, अनिल आहेर, रणजित आहेर, अमोल घोगरे, दिनकर आहेर, सुहास आहेर, विलास घोगरे, संजय घोगरे, सतिश आहेर, चांगदेव घोगरे, मधु घोगरे, महेश आहेर, किरण घोगरे, दीपक घोगरे, सुहास घोगरे, संजय घोगरे, प्रवीण घोगरे, आप्पासाहेब कुरकुटे, आप्पासाहेब दिघे, दिलीप घोगरे, खंडु घोगरे, नासिर मनियार, शंकर राऊत, राधु राऊत भास्कर आहेर, आण्णा तुपे, अमोल कोरडे, शाम ब्राम्हणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जुन्या विधवा प्रथेसारख्या चालीरीती, परंपरा यांना कायमची तिलांजली देऊन आता आपण विज्ञान युगात आहोत यांचे भान समाजातील प्रत्येकाने ठेवले पाहिजे याकरिता आपण सर्वानी समाजात जनजागृती करावी.

- प्रभाताई घोगरे, कृषिभूषण, ग्रा. पंं. सदस्या, लोणी खुर्द

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com